विश्वरत्न डॉ .बाबासाहेब आंबेडकर जीवन गौरव पुरस्कारासह सात पुरस्कारा करिता अर्ज आमंत्रित…! ————————————— अमरावती- अभिजीत बहुउद्देशीय सामाजिक विकास संस्था अमरावती व एकता रॅली आयोजन समिती अमरावती च्या संयुक्त विद्यमाने महामानव बोधिसत्व डॉ .बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती दिनाचे औचित्य साधून अमरावती महानगरामध्ये भव्य दिव्य असा जयंती दिनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात येतो .या कार्यक्रमांमध्ये अनेक सामाजिक उपक्रम राबविण्यात येतात . समाजामध्ये विविध क्षेत्रात सामाजिक कार्य करणारे व अतुलनीय सामाजिक योगदान देणारे समाजसेवक अशा मान्यवरांचा सत्कार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावे विविध पुरस्कार देऊन सन्मान करण्यात येतो. समितीतर्फे यावर्षी सुद्धा विश्वरत्न डॉ .बाबासाहेब आंबेडकर जीवन गौरव पुरस्कार २०२५ या सह सात पुरस्कार संस्थेने जाहीर केले आहे. पात्र असलेल्या मान्यवरांनी या पुरस्काराकरिता अर्ज करावे असे जाहीर आव्हान संस्थेतर्फे मुख्य संयोजक,समाजभूषण राजूजी नन्नावरे, संस्था सचिव सौ. सुरेखा नन्नावरे , व ज्येष्ठ मार्गदर्शक सुदर्शन जैन, डॉक्टर गोविंद कासट, चंद्रकुमार जाजोदिया, डॉक्टर अनिल हरवानी, डॉ. पुरुषोत्तम गजबे , वीरेंद्र शहारे, प्रदीप जैन , चंद्रकांत पोपट, डॉ. नितीन भागवत ,राजेश भाई अटलांनी, राजेश गाढे, डॉ. गोपीचंद मेश्राम, डॉ.मनीष गवई , डॉ.अरुणा वाडेकर, प्रा. सुषमा ताजने ,प्रा. संगीतातून , प्रा. विश्वजीत अंबादे ,अरुण कुमार आठवले, सलीम भाई मिरावाले ,पी. बी. इंगळे, एल.जे.वानखडे, प्रा.मोहन इंगळे सर ,मिलिंद कांबळे, राजेश फुले, अरुण बनारसे , डेटाराम मनोजा, अशोक खंडारे, राजीव ठवरे,टी.एफ.दहिवाडे, लोभेश्वर रंगारी, भारत थूल, श्रीराम डोंगरे, प्रमोद दांडगे, नानाभाऊ रमत्कार, मुस्ताक भाई, आधी संस्थेच्या प्रमुखांनी जाहीर केले आहे. वर्ष २०२५ करीता समाज सेवकांनी १)विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जीवन गौरव पुरस्कार, २)विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर साहित्य रत्न पुरस्कार, ३)विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पत्रकारिता सेवा गौरव पुरस्कार, ४)विश्वरत्न डॉ .बाबासाहेब आंबेडकर वैद्यकीय सेवा रत्न पुरस्कार, ५)विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्योग रत्न पुरस्कार, ६)विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर शिक्षण / कला/ क्रीडा व सांस्कृतिक रत्न पुरस्कार, ७)विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर राजपत्रित अधिकारी/ अधिकारी गौरव पुरस्कार , ८) विश्वरत्न डॉ .बाबासाहेब आंबेडकर समाज रत्न पुरस्कार असे एकूण आठ पुरस्कार वर्ष 2025 करिता जाहीर करण्यात आले असून या करिता पात्र असणाऱ्या समाज सेवकांना संस्थेकडे अर्ज करता येईल. अर्ज हा छापील असून दिनांक १० फेब्रुवारी पासून दिनांक २५ मार्च २०२५ पर्यंत संस्था कार्यालय येथे उपलब्ध असून अर्ज सादर करण्याची अंतिम तिथि दिनांक ३० मार्च २०२५ पर्यंत देण्यात आली आहे. संस्थेचे कार्यालय ” मानवी मॅचिंग सेंटर ” कल्याण नगर मेन रोड, बोळ नंबर ०५ अमरावती , महाराष्ट्र या ठिकाणी उपलब्ध असून. अर्जावर दिलेल्या सूचनाचे संपूर्ण वाचन करून त्याप्रमाणे आवश्यक कागदपत्रे व अटी शर्तीचे पालन करून अर्ज करताना जोडावे. अर्ज समाजभूषण राजूजी नन्नावरे मुख्य संयोजक एकता रॅली आयोजन समिती अमरावती या नावाने करावे. बाहेर गावच्या लोकांनी या ९९६०१२९८०६/ ९१६८१८०३५५ मोबाईलवर संपर्क साधून अधिक माहिती जाणून घ्यावी. असे आव्हान संस्थेच्या सचिव सौ .सुरेखा राजूजी नन्नावरे व प्रसिद्धी प्रमुख श्री .राजेश फुले यांनी या द्वारे केली आहे.